उन्हाळ्याचा झळा सहन केल्यानंतर स्वाभाविकच सर्वांना पावसाचे वेध लागतात. मात्र यंदा केरळमध्ये मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने व्यक्त केली आहे.
दरवर्षी 7 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होते. परंतु, यंदा केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल होत असल्याने 12 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे. तसंच यंदा महाराष्ट्रात पावसाची स्थिती फारशी चांगली नसेल, असा अंदाज आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने त्रासलेले सामान्य आणि शेतकरी राजा यांना यंदा पावसाची अधिकच वाट पाहावी लागणार आहे. (यंदा मुंबईकरांना पावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा,तलाव आटल्याने पाणी टंचाईची शक्यता - 'SKYMET' Weather)
तसंच यंदा देशात सरासरी 93% पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जूनमध्ये महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असेल आणि जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.