प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: archived, edited, representative image)

सरकारी कर्मचारी अनेकदा अधिक पगारासाठी जादा वेळ काम करतात, मात्र सरकारच्या नव्या नियमांनुसार, कर्मचार्‍यांना जादा कामाचा ओव्हर टाईम मिळणार नाही. काही दिवसांपूर्वीच सरकारने कामाची वेळ आठ ऐवजी नऊ तासाची करण्याच्या विचार असल्याचे मीडिया रिपोर्ट समोर आले होते. मात्र आता कामाच्या वेळा वाढल्या की त्याचा परिणाम वेतनावरही होणार असल्याची चर्चा आहे.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार, कर्मचार्‍यांचे वेतन 8 तासांच्या कामावर अवलंबून असते. त्यावर पगार दिला जातो. एका महिन्यात 4 सुट्ट्या असतात. नव्या ड्राफ्ट प्रपोजलनुसार, कामाच्या वेळा  कमीत कमी 9 तास असू शकतात. मात्र त्यामध्ये वेतनवाढीचा उल्लेख नाही '

केंद्रीय श्रम मंत्रालयानुसार, 9 तासापेक्षा अधिक तास काम करणार्‍यांना त्याचा कोणताही ओव्हर टाईम मिळणार नाही. काही खास श्रेणीच्या कर्मचार्‍यांसाठी नियमात बदल होणार आहेत. काही पदावरील व्यक्तींना 12- 16 तास काम करावं लागणार आहे. त्यांच्यासाठी तासाच्या हिशोबानुसार पगार दिला जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय नियमानुसार, 1950 च्या कायद्यानुसार, 9 तास काम केल्यानंतर प्रत्येकाला 150-200% दराने वेतन दिले जाते. मात्र नव्या नियमांनुसार जादा कामाचा ओव्हर टाईम मिळणार नाही. नव्या नियमांनुसार किमान वेतन ठरवाताना  अनेक निकषांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे राज्यनिहाय किमान वेमन वेगवेगळे असू शकते.