MDH मसाला कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी (Dharampal Gulati) यांचे आज (गुरुवार, 3 डिसेंबर) सकाळी निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. कार्डिक अरेस्टमुळे आज पहाटे 5.30 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, गुलाटी यांच्यावर मागील तीन आठवड्यांपासून दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 1923 मध्ये पाकिस्तान मधील सियालकोट येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी शाळा अर्धवट सोडून त्यांनी वडीलांचा मसाल्यांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. धर्मपाल गुलाटी हे 'दालाजी' आणि 'महाशयजी' या नावाने ओळखले जात होते.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच त्यांनी आपले जीवन समाज्यासाठी वाहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पहा ट्विट्स:
Dharm Pal ji was very inspiring personality. He dedicated his life for the society. God bless his soul. https://t.co/gORaAi3nD9
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 3, 2020
1947 मध्ये झालेल्या फाळणीनंतर धर्मपाल गुलाटी भारतात आले आणि अमृतसर येथील एका रेफ्यूजी कॅम्पमध्ये राहत होते. त्यानंतर ते दिल्लीला आले आणि त्यांनी करोल बाग येथे दुकान सुरु केले. गुलाटी यांनी आपल्या कंपनीची सुरुवात 1959 मध्ये केली. त्यानंतर हा व्यवसाय भारतात पुरता मर्यादीत राहिला नाही तर परदेशातही मसाले निर्यात करु लागेल. MDH मसाले कंपनी युके, युरोप, युएई, कॅनडा आणि अन्य ठिकाणी मसाले निर्यात करते.
2019 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विशेष म्हणजे धर्मराज गुलाटी हे आपल्या पगारातील 90% भाग चॅरीटीसाठी देत असतं, अशी माहिती एमडीएच मसाले कंपनीकडून देण्यात आली आहे.