Bankey Bihari Temple Representative Image (Photo Credits: Wikimedia Commons)

Mathura's Banke Bihari Temple Dress Code: मथुरेतील (Mathura) जगप्रसिद्ध बांके बिहारीजी मंदिरात (Banke Bihari Temple) दररोज हजारो भाविक येतात. वर्षभर जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविकांचा ओघ सतत सुरु असतो. आता वर्षाच्या शेवटीही कृष्णभक्त मथुरेला बांके बिहारी यांच्या दर्शनाला पोहोचत आहेत. तुम्हीही जर मथुरेला श्री कृष्णाचा आशीर्वाद घेण्याची योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बांकेबिहारी मंदिर प्रशासनाने येथे येणाऱ्या भाविकांना आवाहन केले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी फाटक्या जीन्स, मिनी स्कर्ट किंवा असे इतर कपडे घालून दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाने लावले पोस्टर-

मंदिर प्रशासनाने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोस्टर लावले आहेत, ज्यात असे लिहिले आहे की- ‘नम्र विनंती, हे धार्मिक स्थळ आहे, पर्यटन स्थळ नाही. सर्व महिला आणि पुरुषांनी सभ्य कपडे घालून मंदिरात यावे. लहान कपडे, हाफ पँट, बर्म्युडा, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फाटलेल्या जीन्स, चामड्याचे पट्टे आणि विचित्र कपडे घालून येऊ नये.’

याधीही केले होते आवाहन-

मंदिर प्रशासनाने कोणत्या प्रकारचे कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाईल आणि कोणत्या प्रकारचे कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही हे स्पष्ट करणारे चित्र लावले आहेत. मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्यांना असे आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही यूपीच्या ठाकूर बांके बिहारी मंदिर आणि ब्रजच्या अनेक मंदिरांनीही मंदिर प्रशासनाने भाविकांना लहान कपडे परिधान न करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Nitin Gadkari On Live-In and Same Sex Marriages: 'लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह समाजासाठी धोकादायक'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता)

बांके बिहारींची पवित्र भूमी असलेल्या मथुरेतील सर्व मंदिरांसाठीही हेच सांगितले आहे. अशाप्रकारे बांके बिहारी मंदिरासाठी हा नियम करण्यात आला आणि इतर मंदिरेही त्याच नियमाचे पालन करताना दिसतात. मथुरेतील कोणत्याही मंदिरात लहान आणि असभ्य कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अशाप्रकारे आता ठाकूर बांके बिहारी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पारंपरिक व सभ्य कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करणे आवश्यक आहे.