Railway | Representational Image |(Photo Credits: PTI)

जळगाव ते मनमाड (Jalgaon Te Manmad) दरम्यान तिसर्‍या रेल्वे लाईनचे (Railway Line) काम सुरू आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने नॉन इंटर लॉक ब्लॉकचा निर्णय घेतला. त्यामुळे नांदेडहून मुंबईकडे आणि मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईहून अदिलाबादकडे धावणारी नंदीग्राम एक्स्प्रेस 13 आणि 14 ऑगस्ट रोजी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय आदिलाबाद येथून मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस 14 आणि 15 ऑगस्टला रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. (हेही वाचा - Mumbai Mega Block: मुंबईत उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक)

जालना ते मुंबई व पुन्हा मुंबई ते जालनाकडे धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस 13 व 14 आणि 14 व 15 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक एक्स्प्रेस नांदेड ते मुंबई आणि मुंबई ते नांदेड धावणारी रेल्वे गाडी दि. 14 व 15 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.  सलग तीन दिवसांचा हा मेगाब्लॉक असणार आहे. नांदेड - अमृतसर व अमृतसर ते नांदेड या मार्गे धावणार्‍या नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेसचा मार्ग 14 ऑगस्ट रोजी बदलण्यात आला आहे.

सिकंदराबाद ते मनमाड धावणारी रेल्वे 13 आणि 14 ऑगस्ट रोजी नगरसोल ते मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली आहे.  अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.