Lockdown in India | File Image | (Photo Credits: PTI)

सध्या कोरोना व्हायरसला भारतामध्ये रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असल्याने सारेच आपापल्या घरात अडकून पडले आहेत. संचारबंदी असल्याने नागरिकांना सक्तीने घरीच बसणं भाग आहे. अशामध्ये लहानमुलांच्या बाहेर फिरण्यावर बंधनं आल्याने त्यांची चीडचीड होत आहे. मंगलोर मध्ये याच लॉकडाऊनच्या काळात सोसायटीमध्ये बाहेरच्या व्यक्तीला प्रवेशबंदी असल्याने किशोरवयीन एका मुलाने चक्क त्याच्या मित्राला सुटकेसमध्ये भरून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एक मुलगा अशाप्रकारे मोठी बॅग खेचत खेचत येत असल्याचं पाहून सोसायटीमधील मंडळींना या गोष्टीमध्ये काहीतरी गडबड असल्याचं समोर आलं. त्यांनी सूटकेस उघडायला सांगितली. तेव्हा त्यांना चक्क त्याचा मित्र सुटकेसमध्ये असल्याचं दिसलं. केवळ Google 3D Animals नव्हे तर Bolo App ते YouTube वरील DIY #WithMe... बच्चेकंपनीचा 21 दिवस लॉकडाऊनचा काळ सत्कारणी लागेल 'या' Google Apps Features सोबत!

सोसायटीमधील मंडळींना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना सारा प्रकार सांगितला. त्यानंतर दोन्ही मुलांना पोलिस घेऊन गेले. त्यांच्या पालकांनादेखील बोलावून हा प्रकार सांगण्यात आला. याबाबत समन्स देण्यात आला. दरम्यान या प्रकाराबद्दल कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

भारतामध्ये दिवसागणिक वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहता आता लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्नय अनेक राज्यांनी घेतला आहे. नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लहान मुलं आणि वयोवृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना जपण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून देण्यात आलं आहे.