कोरोनाच्या काळापासून, लोक ह्दयविकाराने जीव गमावण्याच्या घडामोडी या वाढल्या आहेत, मग ते व्यायामशाळेत जात असतील किंवा खूप नाचत असतील किंवा कुठेतरी प्रवास करत असतील. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्ये पाहायला मिळाला. येथे मृताचा मोठा भाऊ नोकरीतून निवृत्त झाला होता. यासंदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या समारंभात लोक एकामागून एक आनंदाने नाचत आहेत. लहान भाऊ मोठ्या भावाच्या निवृत्तीबद्दल आनंदाने नाचत होता. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो पुरुष एका महिलेसोबत गाण्याच्या तालावर नाचत होता. दरम्यान, अचानक तो जमिनीवर पडला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Nashik Rain: नाशिकमध्ये रामकुंड येथे 29 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला; सुदैवाने तीन वर्षांची चिमुकली बचावली)
पाहा पोस्ट -
एक और नाचते-चलते-मौत LIVE
राजस्थान में अपने बड़े भाई के रिटायरमेंट के मौक़े पर हो रहे समारोह में नाचते हुए शख़्स की हार्ट अटैक से मौत।
ऐसी मौत बेहद आम सी लगने लगी है। इसे रोकने के लिए मेडिकल साइंस कुछ करे।
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) August 4, 2024
मात्र, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. मन्नालाल असे मृत व्यक्तीचे नाव असून ते आपल्या भावाच्या निवृत्तीनिमित्त घरी सत्संगात नाचत होते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर कार्यक्रमात शोककळा पसरली. व्यक्तीच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.