पूजा शकुन पांडे (Photo Credtis Youtube)

Mahatma Gandhi 71st Death Anniversary: भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 71 वी पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी 1948 या दिवशी नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांनी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. असाच प्रकार आज अखिल भारत हिंदू महासभेने (Akhil Bharatiya Hindu Mahasabha) एका कार्यक्रमात केला. गांधीजींच्या पुतळ्याला प्रतिकात्मकरित्या गोळ्या झाडून गांधी पुण्यतिथी साजरी करण्याचा विकृत प्रकार अलिगढ येथे आज घडला.

हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा शकुन पांडे (Puja Shakun Pandey)  यांनी महात्मा गांधीच्या पुतळ्याला गोळ्या झाडल्या. त्यानंतर पुतळ्यातून रक्त बाहेर आले. या प्रकारानंतर त्यांनी सहकार्‍यांसोबत मिठाई वाटून हा प्रकार साजरा केला. नथुराम गोडसे हे भारत हिंदू महसभेशी निगडीत होते. Mahatma Gandhi Death Anniversary: महात्मा गांधी यांच्यावर आधारित हे 5 चित्रपट आवर्जून पाहा

अखिल भारत हिंदू महासभा गांधी पुण्यतिथी हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करते. तसेच अखिल भारत हिंदू महासभेने 'नथुराम गोडसे अमर रहे' अशा घोषणा देखील दिल्या.