Maha Kal Express (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 16 फेब्रुवारीला वाराणसी दौ-यावर गेले असता त्यांनी काशी महा काल एक्सप्रेसला (Maha Kal Express) हिरवा झेंडा दाखवला आणि वाराणसी ते काशी या दिशेने महा काल एक्सप्रेस रवाना झाली. पण तुम्हाला माहित आहे का या एक्सप्रेसमध्ये एक वेगळीच गोष्ट करण्यात आली आहे. या रेल्वेमध्ये भगवान शंकरासाठीही विशेष जागा आरक्षित करण्यात आला असून त्यांचा बर्थ मंदिरासारखा सजविण्यात आला आहे. ही सीट आता कायम भगवान शंकरासाठी आरक्षित राहण्याबाबत रेल्वे प्रशासन विचार करत आहे. रेल्वे अधिका-यांनी असे सांगितले आहे की भगवान शिवसाठी आरक्षित काशी महाकाल एक्सप्रेस (वाराणसी-इंदौर) मध्ये कोच B5 ची आरक्षण जागांची संख्या 64 करण्यात याव्या यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.

महाकाल एक्सप्रेसमध्ये धार्मिक प्रवाशांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनोरंजन आणि आध्यात्माची जाणिव व्हावी यासाठी भजन-किर्तनाचे आयोजन केले जात आहे. सुरूवातीच्या दिवसात एक मंडळ येथे भजन-किर्तन करणार आहे. 20 फेब्रुवारीलाही एक मंडळ या ट्रेनमध्ये भजन-किर्तन करेल. यानंतर कॅसेट किंवा अनाउंसमेंटच्या माध्यमातून प्रवासी भजन-किर्तन ऐकू शकणार आहेत. एक्सप्रेस मधील प्रवाशांना टॉयलेट मधील पाणी विकत असल्याच्या आरोपावरून रेल्वे कर्मचाऱ्याला अटक

ANI चे ट्विट:

20 फेब्रुवारीपासून वाराणसीहून इंदूरकडे जाणाऱ्या काशी-महाकाल एक्स्प्रेसमध्ये आठ वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचे पॅकेजही असेल. आयआरसीटीसीने वाराणसी, अयोध्या, प्रयागराज, इंदूर, उज्जैन, भोपाळ येथील धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे पॅकेजही तयार केले आहे.

या दिवशी धावणार महाकाल एक्स्प्रेस

ही रेल्वे वाराणसी येथून मंगळवार आणि गुरुवारी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. लखनौ, कानपूर, बीना, भोपाळ, उज्जैन मार्गे ते इंदूरला पोहोचेल. बुधवारी आणि शुक्रवारी इंदूर, उज्जैन, संत हिरडाराम नगर (भोपाळ), बीना, कानपूर आणि लखनऊ वाराणसीला जाईल. रविवारी वाराणसी-इंदूरमार्गे अलाहाबाद-कानपूर-बीना येथून ट्रेन धावणार आहे. सोमवारी ती इंदूरला पोहोचेल. दर सोमवारी इंदूर, उज्जैन, संत हिरडाराम नगर, बीना, कानपूर, अलाहाबाद वाराणसीला पोहोचेल.