Google Representational Image (Photo Credits: IANS)

आजकाल गूगल (Google) हा प्रत्येकासाठी माहिती मिळवण्याचा सर्वात विश्वासार्ह स्त्रोत बनला आहे. प्रत्येक शंका किंवा माहितीचा शोध या शोध इंजिनवर (Search Engine) घेतला जातो.  2019 च्या अखेरीस गुगल ट्रेंडने या सर्च इंजिनवर सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या ट्रेंडचा आढावा घेतला आहे. भारतात शोधल्या गेलेल्या सर्व प्रकारच्या गोष्टींमधून, स्पोर्ट्स इव्हेंट्स, चित्रपट, गाणी, व्यक्तिमत्त्वे, जवळपासच्या गोष्टी आणि 'कसे करावे...' यातील 2019 मधील 10 महत्वाचे शोध सूचीबद्ध केले गेले आहेत. भारतात 2019 मध्ये ‘क्रिकेट वर्ल्डकप’ (Cricket World Cup) ही गोष्ट सर्वात जास्त सर्च झाली आहे.

2019 मध्ये गुगलवर सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या गोष्टी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

विश्वचषकानंतर  लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections), चंद्रयान 2 (Chandrayaan 2), कबीर सिंग सारखे चित्रपट, अनुच्छेद 370, एनईईटी निकाल (NEET Results), मार्वल, पीएम किसन योजना या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. यासोबत 'What is..' आणि 'How to..'  या गोष्टीशी भारतात सर्वात जास्त शोधल्या गेल्या आहेत. How-to कॅटेगरीत सर्वात जास्त शोधली गेलेली गोष्ट म्हणजे,  'How to Vote' ही आहे. या यादीमध्ये 'Near me...' श्रेणीत शोधल्या गेलेल्या गोष्टींची यादीही दिली आहे. या श्रेणीमध्ये dance classes, salons, costume stores, mobile stores अशा गोष्टी सर्वात जास्त शोधल्या गेल्या आहेत. (हेही वाचा: Year Ender 2019: भारतरत्न लता मंगेशकर ते बेबी डॉल सनी लिओनी, हे आहेत ट्विटर वर ट्रेंड झालेले Top 10 Female Twitter Handles)

यावर्षी गुगल इंडियामध्ये या वरील गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या गेल्या आहेत. कबीर सिंग हा एकमेव बॉलीवूड चित्रपट आहे, जो पहिल्या दहा सर्चमध्ये आहे. हॉलिवूड बद्दल बोलायचे झाले तर,  जोकर, अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम आणि कॅप्टन मार्वल या गोष्टी लोकांनी सर्वात जास्त सर्च केल्या आहेत.