मध्य प्रदेश: सातत्याने पबजी गेम खेळताना 16 वर्षीय मुलाला हृदयविकाराचा झटका
PUBG (Photo Credit: File Photo)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नीमच जिल्ह्यात एका 16 वर्षीय मुलगा सातत्याने 2-3 तास पबजी गेम (PUBG) खेळत होता. त्यावेळी त्याचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान त्याची छोटी बहिण हा प्रकार घडला तेव्हा त्याच्या समोरच होती. परंतु घरातील मंडळींचे असे म्हणणे आहे की, मुलगा सातत्याने पबजी खेळत असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

फुकरान कुरैशी असे या मृत मुलाचे नाव आहे. फुकरान घरात सातत्याने पबजी गेम खेळत असे. या कारणामुळे त्याच्या वडिलांनी त्याला पबजी गेम खेळण्यासाठी बंदीसुद्धा घातली होती. मात्र वडिलांकडे कानाडोळा करत तो सातत्याने पबजी गेम खेळत असे. तसेच पबजी गेम खेळताना फुकरान जोरजोरात ब्लास्ट होईल असे ओरडत होता. त्यानंतर अचानक गेम खेळताना खाली पडला. त्यावेळी फुकरान याला तातडीने डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच फुकरान याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.(Pubg Addiction: पबजी गेम खेळण्याच्या नादात तरुण अॅसीड प्यायला; प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु)

या प्रकरणी स्थानिक डॉक्टरांनी यावर स्पष्टीकरण दिले असून, पबजी गेम सातत्याने खेळत राहिल्यास त्यामधील पात्रात आपणच असल्याचे भासते. तर ही क्रिया सातत्याने सुरु राहिल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता फार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फुकरान सोबत सुद्धा हाच प्रकार घडला असून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.