MP By Poll Election Results 2020 (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या काळात निवडणूक होणारे बिहार हे देशातील पहिले राज्य आहे. आज मध्य प्रदेश विधानसभेच्या (MP Bypoll Results) पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मध्य प्रदेशच्या 28 जागांसाठी पोटनिवडणुक झाली आहे. यातील बहुतांश मतदारसंघ हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे सहाजिकच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांना भावतील असे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी येतील असा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. यात अनेक धुरंदर राजकीय नेते आणि नवोदित उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. त्यामुळे आज जनमताचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) सकाळी आठ वाजल्यापासून ट्रेंड जाहीर करण्यास सुरुवात करतील, तर अंतिम चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.  Madhya Pradesh By-Election 2020: मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात Basmati GI Tag ठरतोय राजकीय मुद्दा

या संपूर्ण निकालाचा लेखाजोगा पाहण्यासाठी News18 Chattisgarh Live च्या या लिंकवर  क्लिक करा. मध्यप्रदेशात 16 वर्षात 31 पोटनिवडणुकांनतर ही पहिली वेळ आहे जेथे 28 जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. त्यामुळे येथे होणारी लढत ही खूपच चुरशीची असणार आहे.

अनेक मुद्दे उचलून येथील लोकांची मनं आणि मत जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजप पक्षाने जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कुणाला जनमताचा कौल मिळणार हे काही वेळातच कळेल.