Madhya Pradesh By-Election 2020: मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात Basmati GI Tag ठरतोय राजकीय मुद्दा
Basmati Rice | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणूक (Madhya Pradesh By-Election 2020) प्रचारात बासमती तांदूळ (Basmati Rice) आणि त्याचा भौगोलिक संकेतांक टॅग (Basmati GI Tag) हा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. हाच मुद्दा घेऊन दोन्ही पक्ष शेतकऱ्यांना आपण कसे महत्त्वाची जबाबदारी बजावू शकतो आणि या आधीही हा टॅग मिळविण्याच्या दृष्टीने कशी जबाबदारी भूषवली हे सांगत आहेत.

मध्य प्रदेश राज्याला बासमती तांदळाबात जीआय टॅग देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मद्रास उच्च न्यायालयाने मध्य प्रदेशद्वारा दाखल करण्यात आलली बासमती तांदळाला जीआय टॅग बाबतची याचिका फेटाळली आहे. त्यानंतर मध्य प्रदेश राज्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, गेल्या काही काळामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंदर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मध्य प्रदेश राज्याला बासमती तांदळाचा जीआय टॅग देण्यास विरोध केला आहे. या सर्व गोष्टींकडे पाहता असे दिसते की बासमती तांदळाला जीआय टॅग देणे हा हळूहळू राजकीय मुद्दा बनत चालला आहे. (हेही वाचा, मध्य प्रदेशातील रानीपूर येथील खाण मालकाला सापडला 50 लाख किंमतीचा हिरा)

मध्यप्रदेश राज्यात 27 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे. यातील बहुतांश मतदारसंघ हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे सहाजिकच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांना भावतील असे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी येतील असा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे.