
लखनौ (Lucknow) मधील गोंडा या ठिकाणी एका मुस्लिम परिवाराने आपल्या नवजात मुलाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) असे ठेवले होते. परंतु आता या मुस्लिम परिवाराने या बाळाच्या नावात बदल करत 'मोहम्मद अल्ताफ आलम मोदी' असे ठेवले आहे. दरम्यान बाळाच्या जन्म दिनाकांवरुन वाद निर्माण झाला असून त्याचा जन्म 23 मे रोजी झाला असल्याचे सांगण्यात आले होते.
नवजात बाळाच्या परिवारावर समाज आणि मुस्लिम समुदायाने दबाव टाकत नावात बदल करण्यास सांगितले. बाळाची आई मेहनाज बेगम यांनी असे म्हटले आहे की, काही नातेवाईकांनी मोदी नाव ठेवले म्हणून आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला उपस्थितीसुद्धा लावली नाही. त्यामुळे हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून मेहनाज हिने बाळाच्या नावात बदल करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले आहे. परंतु आता सुद्धा बाळाच्या नावात 'मोदी' हा शब्द ठेवण्यात आला आहे.
(लखनौ: लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी झाला मुलगा, मुस्लिम परिवाराने नाव ठवले नरेंद्र मोदी)
मात्र बाळाच्या जन्म दिनांकावरुन वाद निर्माण झाला असून स्थानिक डॉक्टरांनी बाळाचा जन्म 12 मे रोजी झाला असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत लोकप्रियता मिळवण्यासाठी महिलेने बाळाचा जन्म हा 23 मे रोजी झाला असल्याचे जाहीर केले.