आजपासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये (LPG Gas Cylinder Prices) कपात करण्यात आली आहे. 3 महिन्यांनी आज एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 1 एप्रिल 2024 दिवशी आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात 30.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. ही दर कपात19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्येच करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
जानेवारी महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर 1.50 रूपयांनी महागला. नंतर पुढील महिन्यात पुन्हा त्यामध्ये 14 रूपयांची वाढ झाली आणि मार्च महिन्यातही 25.50 पैशांनी गॅस सिलेंडर्स महागले होते. एप्रिल महिन्यात 3 महिन्यांनी दरकपात जाहीर करण्यात आली आहे.
पहा गॅस सिलेंडर्स चे दर
दिल्लीत एलपीजी सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 झाले आहेत. तर कोलकात्यात गॅस सिलेंडरच्या किमती 32 रुपयांनी कमी 1879 रूपये झाले आहेत. मुंबईत गॅस सिलेंडरचे दर 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रूपये झाले आहेत. चेन्नईमध्ये सिलेंडरच्या किमती 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रूपये झाल्या आहेत.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती स्थिर आहेत. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.