महिन्याच्या पहिल्याचं दिवशी सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. LPG सिलेंडरच्या (Cylinder) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पण ही कपात घरगूत सिंलेडरवर नाही तर व्यावसायिक सिलेंडरवर (Commercial Cylinder) करण्यात आली आहे. LPG व्यावसायिक सिलेंडरचा दर 36 रुपयांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे महागाईचा दर कमी होण्यास मदत होईल. इंडियन ऑइलने (Indian Oil) 1 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, व्यावसायिक सिलेंडर वापरकरत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. तरी घरगूत सिलेंडरवर मात्र दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याआधी घरगूती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 19 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती पण तेव्हापासून घरगूती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल करण्यात आलेले नाही.
इंडियन ऑइलने (Indian Oil) आज नव्याने जाहीर केलेल्या किमतींनुसार आजपासून मुंबईत (Mumbai) व्यावसायिक सिलेंडरचा दर 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. यापूर्वी तो 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता पण LPG व्यावसायिक सिलेंडरचा दर 36 रुपयांनी कमी केल्यामुळे व्यावसायिक सिलेडर वापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. तरी देशातील वेगवेगळ्या शहरात व्यावसायिक सिलेंडरच्या वेगवेगळ्या किमती असतील. म्हणजेच राजधानी दिल्लीत (Delhi) पूर्वी 2012.50 रुपयांना मिळणार 19 किलो व्यावसायिक सिलेंडर आता 1976.50 रुपयांना मिळेल. तर कोलकत्यात (Kolkata) याचं LPG व्यावसायिक सिलेंडरसाठी 2095.50 तर तर चेन्नईत (Chennai) 2141 एवढी रक्कम मोजावी लागेल.
The price of a commercial LPG cylinder has been cut by Rs 36 from today. With this latest reduction, a 19 kg commercial LPG cylinder will cost Rs 1,976, instead of Rs 2012.50.
— ANI (@ANI) August 1, 2022
गेल्या महिन्यात म्हणजे 1 जुलै रोजी एलपीजी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली होती. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर तब्बल 198 रुपयांनी कमी करण्यात आले होते. आज इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या किमतींनुसार, 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर (LPG Commercial Cylinder Price) 36 रुपयांनी स्वस्त झाला आहे.