लखनऊत एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोट झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या स्फोटात पती-पत्नीसह 5 जणांचा मृत्यू झाल्याची झाला आहे. ही घटना लखनऊमधील काकोरी भागात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिलिंडरचा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण परिसर हादरवून गेला. मुशीर अली (वय 50 ) हुस्ना बानो (वय 45) रैया (वय 5) हुमा (वय 3) आणि हिबा (वय 2) अशी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. (हेही वाचा - Kanpur Shocker: तरुणाने प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, मात्र प्रियकराचा लग्न करण्यास नकार; सूड घेण्यासाठी प्रेयसीने त्याच्या गाडीला लावली आग (Watch Video))
लखनऊमधील काकोरी भागात मुशीर अली आपल्या कुटुंबासहित राहत होते. मंगळवारी मुशीर आणि हुस्ना बानो यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे काही नातेवाईक त्यांच्या घरी आले होते. रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण झोपी गेले. त्यावेळी घरात अचानक आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. आग किचनपर्यंत गेल्यानंतर काही क्षणात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण घर कोसळले.
या भीषण दुर्घटनेत मुशीर यांच्यासह हुस्ना बानो आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजले नाही आहे.