भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) उमेदवारांची 10 वी यादी जाहीर केली असून 9 उमेदवारांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशातील 7 जणांचा समावेश आहे. उर्वरित 2 उमेदवार पश्चिम बंगालमधील आसनसोल आणि चंदीगड येथील आहेत. किरण खेर यांचे चंदीगडमधून तिकीट रद्द करण्यात आले आहे. जयवीर सिंह ठाकूर यांना मैनपुरीतून तिकीट मिळाले आहे. एसएस अहलुवालिया आणि चंदीगडमधील संजय टंडन आहेत. यावेळी किरण खेर (Kiran Kher) यांचे चंदीगडमधून तिकीट कापण्यात आले आहे. (हेही वाचा - Loksabha Election 2024: शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी)
पाहा पोस्ट -
BJP releases its 10th list of candidates for the Lok Sabha elections.#LokSabaElection2024 pic.twitter.com/gyPPEm7Z40
— ANI (@ANI) April 10, 2024
या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 7 उमेदवार यूपीमधील आहेत. यादीनुसार, मैनपुरीमधून जयवीर सिंग, बलियामधून नीरज शेखर, मछली शहरातून बीपी सरोज, गाझीपूरमधून पारस नाथ राय, कौशांबीमधून विनोद सोनकर, फुलपूरमधून प्रवीण पेटल आणि अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आलीय. उर्वरित २ उमेदवार पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून एसएस अहलुवालिया आणि चंदीगडमधून संजय टंडन आहेत.
यंदा खासदार किरण खेर यांचं चंदीगडमधून तिकीट कापण्यात आले आहे. प्रवीण पटेल यांना फुलपूरमधून उमेदवारी देण्यात आलीय. नीरज त्रिपाठी यांना अलाहाबादमधून तिकीट देण्यात आले आहे. जयवीर सिंह ठाकूर यांना मैनपुरीतून तिकीट मिळाले आहे. एसएस अहलुवालिया आणि चंदीगडमधील संजय टंडन आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दोन उमेदवारांची घोषणा
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली. यावेळी साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी देण्यात आली.