दिल्ली: मतदान करणाऱ्यांना मिळणार औषधोपचारात 10-15% सूट; 'या' रेस्टोरन्टमध्ये घ्या मोफत जेवणाचा आस्वाद
Voting (Representative Image/ Photo credit: PTI/File image)

आगामी लोकसभा निवडणूकीत (Loksabha Elections 2019) अधिकाधिक लोकांनी मतदानात सहभाग घ्यावा यासाठी त्यांना प्रेरीत केले जात आहे. मतदानाला भरभरुन प्रतिसाद मिळण्यासाठी देशात निवडणूक आयोगाकडून विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. अनेक सेलिब्रेटी, स्टार मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मतदान करण्यासाठी नागरिक प्रेरीत व्हावेत म्हणून अनेक जाहिरातीतून लोकांना आवाहन करण्यात येत आहे. मालिका, कार्यक्रमातून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्याचबरोबर आता व्यावसायिकांकडून मतदानाला प्रोत्साहन देणारे एक पाऊल उचलण्यात आले आहे.

दिल्ली जवळील नोएडा केमिस्ट असोसिएशननं मतदान करणाऱ्यांना औषधांवर 10% सूट देण्याची घोषणा केली आहे. यात खाजगी रुग्णालयांनीही सहभाग घेतला आहे. मतदान करणाऱ्यांना मोफत तपासणी आणि उपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. तर काही रुग्णालयात तपासणी आणि उपचार खर्चात 10-15% सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केल्यास तुम्हाला 'दादी की रसोई' या रेस्टोरन्टमध्ये मोफत जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.

देशभरात सात टप्प्यात निवडणूका पार पडणार असून 23 मे रोजी निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.