मतदान (File Image)

देशातील 21 राज्यांतील 102 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज काही ठिकाणच्या हिंसाचाराच्या घटना वगळता शांततेमध्ये मतदान  हे पार पडले. तब्बल 60 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. पश्चिम बंगाल, छत्तीसगड या दोन राज्यांतील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये ही प्रक्रिया पार पडली. बंगालमधील हिंसाचारामध्ये 25 पेक्षाही अधिक लोक जखमी झाले आहेत.  केंद्रीय निवडणूक आयोगाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली असून यात 60.03 टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के आणि महाराष्ट्रात 55 टक्के मतदान झाले. यातच कुठे किती टक्के मतदान झालं आहे, (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: तामिळनाडू मध्ये 102 वर्षाच्या महिलेने Reddiyarchatram मध्ये मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा अधिकार! (Watch Video))

पाहा पोस्ट -

राज्यात पूर्व विदर्भामध्ये उन्हामुळे मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. सर्वांत कमी मतदान आज बिहार राज्यात झाले. या राज्यात केवळ 47.49 टक्के एवढ्याच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मणिपूरमध्ये आज मतदानाच्या दिवशीही हिंसाचार झाला. या राज्यातील मोरांग या विधानसभा क्षेत्रात एका बुथवर समाजकंटकांनी गोळीबार केला. यात तीन जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील कुचबिहार भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली असून यात 60.03 टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये 55.29 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी देशातील एकूण मतदानापेक्षाही कमी आहे.