उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं कल्याण, जळगावसह तीन लोकसभा उमेदवार (Kalyan Jalgaon Palghar and Hatkangale) आज जाहीर केले. यामध्ये कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेतून सत्यजीत पाटील, पालघरमधून भारती कामडी यांना तर जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपनं विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. करण पवार (Karan Pawar) यांचं नवा खुद्द उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनीच सुचवल्याचं यावेळी ठाकरेंनी सांगितलं. ( Unmesh Patil Quit BJP Join Shiv Sena (UBT): उद्धव ठाकरे यांचा भाजपला धक्का; उन्मेश पाटील यांचा शिवसेना (UBT) प्रवेश)
करण पवार हे उन्मेष पाटलांचे कट्टर समर्थक आहेत. पारोळा-एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे करण पवार हे नातू आहेत.
पाहा पोस्ट -
#WATCH | Mumbai, Maharashtra | BJP MP from Jalgaon Unmesh Patil joined Shiv Sena (UBT) in the presence of UBT chief Uddhav Thackeray. https://t.co/IdVuPI2F5P pic.twitter.com/x1BvIspGU0
— ANI (@ANI) April 3, 2024
शिवसेनेच्या ठाकरे गटाची दुसरी यादी -
- कल्याण लोकसभा - वैशाली दरेकर
- हातकणंगले - सत्यजीत पाटील
- पालघर - भारती कामडी
- जळगाव - करण पवार
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणी फिसकटली नाही. हातकणंगले आणि सांगली आम्ही लढात आहोत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिकडचे राजकीय गणित पाहता आम्हाला कार्याकर्त्यांनी विनंती केली की आमचा उमेदवार द्यावा. राजू शेट्टी यांना म्हटलं आम्ही पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला. मी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आमचे जुने ऋणानुबंध आहेत. यावेळेस जमलं नाही. पण ते हुकूमशाहीविरोधात एकत्र येतील असं वाटलं होतं. असे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.