डॉ. जोसेफ मार थोमा यांच्या 90 व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता करणार संबोधित; येथे पहा Live Streaming
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन (Dr. Joseph Mar Thoma Metropolitan) यांच्या 90 व्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लोकांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी यासंबंधित माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. आज सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे पंतप्रधान मोदी बोलणार आहेत. याच कार्यक्रमात मार थोमा चर्च (Mar Thoma Church) चे भारतातील आणि भारताबाहेरील अनेक फॉलोअर्स सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम तुम्ही डीडी (DD) किंवा नमो अॅपवर (NaMo App) देखील पाहू शकता.

यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले, "Dr. Joseph Mar Thoma Metropolitan यांच्या 90 व्या जन्मदिनानिमित्त बोलण्यासाठी मी उत्सुक आहे. सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे कार्यक्रमाला सुरुवात होणार असून यात देशा-परदेशातील मार थोमा चर्चचे अनुनायी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम तुम्हाला DD किंवा नमो अॅपवर पाहता येईल."

PM Narendra Modi Tweet:

इथे पहा कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग:

 

जोसेफ मार थोमा यांचा जन्म 27 जून 1931 रोजी झाला होता. ते 21 वे मार थोमा मेट्रोपॉलिटन आहेत. त्याचप्रमाणे सध्याच्या मार थोमा सिरीयन चर्चचे प्रायमेट आहेत. या चर्चचे मुख्यालय केरळमध्ये आहे.दरम्यान पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी डॉ. जोसेफ मार थोमा प्रसिद्ध आहेत. पर्यावरणाचे संवर्धन न केल्यास काय हानी होऊ शकते यासंदर्भात त्यांनी लोकांना जागृत केलं आहे. तसंच डॉ. जोसेफ मार थोमा यांनी पंपा नदीच्या संरक्षणासाठी स्वतः आंदोलनात सहभाग घेतला होता.