Salman Khan, Lawrence Bishnoi and Munawar Faruqui. (Photo credits: Instagram and ANI)

Lawrence Bishnoi's ‘Hit List’: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) टोळी चर्चेत आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी या टोळीने घेतली आहे. याचे कारण त्यांची सलमान खानसोबतची मैत्री असल्याचे सांगितले जात आहे. आता समोर आले आहे की, सलमानशिवाय कॉमेडियन मुनावर फारुकी देखील बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने संकलित केलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिट-लिस्टमध्ये बॉलीवूड कलाकार, विनोदी कलाकार, राजकारणी आणि इतर काही लोकही समाविष्ट आहेत.

दसऱ्याच्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी, सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी सुरू आहे. त्याच्या टोळीतील एका सदस्याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. पोलीस हत्येतील आरोपींना अटक करून त्यांची चौकशी करत आहेत.

जवळजवळ 700 सदस्यांची मजबूत टोळी असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने वर्षाच्या सुरुवातीला बॉलीवूड स्टार सलमान खानवर हल्ला केला होता. यापूर्वी गँगस्टर गोल्डी ब्रारने पंजाबी संगीतकार सिद्धू मूसवाला यांच्या हत्येसाठी बिश्नोई टोळीला जबाबदार धरले होते. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बिश्नोई टोळीचा हेतू आता फक्त सलमान खापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर तो त्यापलीकडे गेला आहे. ते म्हणाले, ही टोळी आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यावर एकेकाळी दाऊद इब्राहिमचे राज्य होते आणि आता त्याच प्रकारे बिश्नोई स्वतःची डी-कंपनी स्थापन करत आहे. एनआयएच्या चौकशीदरम्यान लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या टॉप टार्गेटबद्दल सांगितले आहे. (हेही वाचा: Lawrence Bishnoi Gang: तब्बल 700 शूटर्स, 11 राज्यात दहशत, लॉरेन्स बिश्नोई चालत आहे Dawood Ibrahim च्या मार्गावर, NIA चा दावा)

बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये या नावांचा समावेश आहे-

सलमान खान- बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये अभिनेता सलमान खानचा समावेश आहे. बिश्नोई टोळीचा सलमान खानसोबतचा कलह काळवीट शिकार प्रकरणात खानच्या सहभागापासून सुरू झाला.

झीशान सिद्दीकी- दिवंगत बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झीशान सिद्दीकी हा देखील लक्ष्य होता, असे आरोपी बंदूकधारी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांनी पोलिसांना सांगितले.

मुनावर फारुकी- टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कॉमेडियन मुनावर फारुकी याचाही समावेश आहे. त्यालाही बिष्णोई टोळीने लक्ष्य केले होते.

शगुनप्रीत सिंग- मृत पंजाबी गायक सिद्धू मूसवालाचा मॅनेजर शगनप्रीतचा देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या या यादीत समावेश आहे.

गँगस्टर कौशल चौधरी- कुख्यात बंबीहा टोळीचा सदस्य आणि बिश्नोईचा प्रतिस्पर्धी, कौशल चौधरीवर मिद्दुखेरा मारेकऱ्यांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप होता, त्यामुळे चौधरी बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर आहे.

अमित डागर- कौशल चौधरीचा जवळचा सहकारी डागर हा देखील मिद्दुखेरा याच्या मृत्यूमध्ये सामील होता आणि त्यांनतर तो बिश्नोईच्या रडारवर आला.