Lalit Modi यांच्या पत्नीचे निधन
मिनल मोदी (फोटो सौजन्य- ट्विटर)

London : आयपीएल (IPL) प्रकराणातील आरोपी ललित मोदी (Lalit Modi) यांची पत्नी मिनल मोदी (Minal Modi)  यांचे लंडनमध्ये निधन झाले आहे. ललित मोदींनी भावनिक ट्विटच्या माध्यामातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ललित मोंदीनी केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'मिनल तु माझे प्रेम, जीवन होती आणि सहचारिणीही होतीस. तु आता आमच्याकडे पाहत असशील. तु माझ्यासोबत आयुष्यभर असशील आणि तुला दिलेले वचन मी पूर्ण करीन. तसेच आपल्या मुलांची काळजी घेईन. या सर्व घटनांमध्ये तू आमच्या सोबत असशील' असे ट्विटमधून भावना व्यक्त केल्या आहेत.

मिनल मोदी या 64 वर्षांच्या होत्या. तसेच त्यांना अनेक वर्षांपासून कर्करोगाने ग्रासले होते. मात्र मिनल यांच्या मृत्यूचे नेमके कारण ललित मोदी यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले नाही आहे.