किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित ‘’ (Laapataa Ladies) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसून मात्र प्रेक्षक आणि समिक्षकांकडून या चित्रपटाची चांगली स्तुती ऐकायला मिळत आहे. या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखवला जाणार आहे. (हेही वाचा - Shah Rukh Khan Left For Switzerland: शाहरुख खान स्वित्झर्लंडला रवाना; लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळणार विशेष पुरस्कार)
‘लापता लेडीज’ आज (9 ऑगस्ट रोजी) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रदर्शित केला जाणार आहे. यासंदर्भात एक नोटीस देण्यात आली आहे, ज्यामध्ये या चित्रपटाच्या स्क्रीनिंगबद्दल माहिती दिली आहे. निर्माता आमिर खानसह स्वतः किरण रावही या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश स्क्रिनिंगला उपस्थित राहतील. तसेच इतर न्यायाधीश त्यांच्या जोडीदारासह या सिनेमाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत. हा चित्रपट संध्याकाळी 4.15 ते 6.20 या वेळेत न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर दाखवला जाईल.
सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केला आहे, त्यामुळेच ही स्क्रीनिंग होत आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनींगनंतर प्रेक्षक आणि दिग्दर्शक किरण राव तसेच या चित्रपटाचा निर्माता आमिर खान यांच्यासोबत संवाद साधणार आहे.