अभिमानस्पद! महाराष्ट्राचे सुपुत्र मनोज मुकुंद नरवणे आज लष्करप्रमुख पदी स्वीकरणार कार्यभार
Lt Gen Manoj Mukund Naravane (Photo Credits : commons.wikimedia)

भारत सरकार लष्करप्रमुख पदी महाराष्ट्राचे सुपुत्र मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) हे आज विराजमान होणार असून शासकीय कार्यक्रमात ते हा पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या कार्यकाळाचा आज 31 डिसेंबर रोजी अखेरचा दिवस असणार आहे. आजपासून यापुढे नरवणे हे लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) अशा तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (CDS) म्ह्णून काम पाहतील. ले.ज. मनोज नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख असतील. जनरल अरूणकुमार वैद्य (General Arunkumar Vaidya) यांच्यानंतर लष्कर प्रमुखपद भुषवणारे ले.ज. मनोज नरवणे हे पहिलेच मराठी अधिकारी असल्याचे सांगितले जाते.

ले.ज. मनोज नरवणे याच्याबाद्ल थोडक्यात माहिती करून घ्याची झाल्यास, नरवणे हे पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत.1980 मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्री 70 वी बटालीयनमधून आपली लष्करी कारकिर्द सुरु केली. त्यांचे वडील सुद्धा हवाई दलात अधिकारी होते.ले.ज. मनोज नरवणे यांना युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम करण्याचा मोठा अनुभव आहे. याशिवाय, आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. नरवणे यांना भारत सरकारकडून परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदक अशा विविध पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, 2019 हे वर्ष महाराष्ट्रासाठी विशेष आनंदाचे ठरले कारण, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शरद अरविंद बोबडे (Sharad Arvind Bobde) यांची नुकतीच नियुक्ती झाली. बोबडे यांच्या नियुक्तीच्या रूपात मोठ्या काळानंतर मराठमोळी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर विराजमान झाली. आहे तर, दुसरीकडे ले.ज. मनोज नरवणे यांच्या रुपाने आज पुन्हा एकदा मराठमोळ्या व्यक्तीमत्वास देशाच्या सर्वोच्च यंत्रणेचा प्रमुख म्हणून काम पाहण्याची संधी मिळणार आहे.