Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

कोटा येथील एक इंजिनियर तरूण IRCTC कडून अवघे 33 रूपयांचे रिफंड मिळवण्यासाठी दोन वर्ष झगडा करत आहे. GST लागू होण्यापूर्वीच तिकीट रद्द केले तरीही या तरूणाला सर्व्हिस चार्ज आकारण्यात आला होता. एप्रिल 2017 मध्ये 30 वर्षीय तरूणाने तिकीट काढले होते त्यानंतर ते रद्ददेखील केले.

सुजित स्वामी(Sujeet Swami) असे या तरूणाचे नाव असून कोटा -दिल्ली प्रवासादरम्यान (Kota-Delhi) या तरूणाने तिकीट काढून नंतर रद्द केले. परतावा म्हणून त्याला 33 रूपये देण्यात आले मात्र 2 रूपये अधिक म्हणजे 35 रूपये मिळावेत अशी त्याची अपेक्षा होती.

Golden Temple Mail या ट्रेनचं तिकीट एप्रिल 2017 मध्ये बुक करण्यात आलं होतं. सुजित 2 जुलै 2019 दिवशी प्रवास करत होता. तिकीटाची किंमत 765 रूपये इतकी होती. ती रद्द केल्यानंतर665 रूपये रिफंडमध्ये मिळाले. कॅन्सलेशन फी 65 ऐवजी 100 आकारल्याचं त्याने सांगितलं. सर्व्हिस टॅक्सच्या नावाखाली 35 रूपये अधिक आकारल्याचं त्याने सांगितले. यावरून त्याने आरटीआय देखील दाखल केला आहे.

आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलैपूर्वी रद्द केलेली तिकीटं बुकींगच्या वेळेस आकारण्यात आलेल्या सर्व्हिस टॅक्ससह रिफंड केली जातील हा निर्णय नंतर देण्यात आला आहे. डिसेंबर 2018 पासून एप्रिल महिन्यापर्यत तब्बल 10 वेळा सुजितचा अर्ज विविध विभागात फिरवला गेला. अखेर एप्रिल महिन्यात 33 रूपये बॅंक अकाऊंटमध्ये जमा झाले असे त्याने पीटीआयशी बोलताना सांगितले आहे.