Union Minister Nitin Gadkari (PC - ANI)

आता भारतीयांना पादत्राणामध्येही हस्तकाम केलेल्या खादीच्या कपड्यांचे सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी (Union Minister for MSME Nitin Gadkari) यांनी खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC ) डिझाइन केलेल्या खादी फॅब्रिकपासून बनविलेल्या उच्च दर्जाच्या पादत्राणांची (khadi Fabric Footwear) विक्री सुरू केली. ही पादत्राणे रेशीम, सूती आणि लोकरी खादीच्या कपड्यांनी बनविलेले आहेत. KVIC चे ई-पोर्टल www.khadiindia.gov.in द्वारे गडकरी यांनी या खादी पादत्राणाची ऑनलाइन विक्रीही सुरू केली आहे. खादीच्या कपड्यापासून बनविलेल्या पादत्राणांचे कौतुक करीत गडकरी म्हणाले की, ‘अशा अनोख्या उत्पादनांद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याची फार मोठी क्षमता आहे.’

यापूर्वी नितीन गडकरी यांनी KVIC ला महिलांच्या हँडबॅग, पर्स, वॉलेट्ससारख्या चामड्याच्या उत्पादनांना पर्याय म्हणून, हस्तकला केलेले खादीचे कपडे विकसित करण्याचे निर्देश दिले होते. गडकरी म्हणाले, ‘खादीचे पादत्राणे हे एक अनन्य उत्पादन आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि पाटोला रेशीम, बनारसी रेशीम, कापूस, डेनिम यांचा केला वापर नक्कीच तरुणांना आकर्षित करेल. ही उत्पादने लोक ऑनलाइन खरेदी करू शकतील. ही पादत्राणे स्वस्त आहेत.’ अशा उत्पादनांचा विकास व निर्यात केल्यास खादी भारत 5000 हजार कोटी रुपयांचा बाजारपेठ ताब्यात घेईल, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. (हेही वाचा: केंद्र सरकार मोठा निर्णय; 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 3,737 कोटी रुपयांचा बोनस जाहीर, जाणून घ्या कधी मिळेल रक्कम)

ही पादत्राणे महिलांसाठी 15 डिझाईन्स आणि पुरुषांसाठी 10 डिझाईन्समध्ये लाँच करण्यात आली आहेत. हे पादत्राणे अद्वितीय आणि फॅशनेबल बनविण्यासाठी, पाटोला रेशीम, गुजरातचा बनारसी रेशीम, मधुबनी छापील रेशीम, खादी डेनिम, तसर रेशीम, मटका - कटीया रेशीम, विविध प्रकारचे सूती कापड, ट्वीड लोकर आणि खादी पॉलिस्टाईल या उत्कृष्ट कापडांचा वापर केला गेला आहे. ही पादत्राणे डिझाइन, रंग आणि प्रिंट्सच्या विस्तृत प्रकारात उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही ही उत्पादने विविध कार्यक्रम- औपचारिक, प्रासंगिक आणि उत्सवाच्या प्रसंगी परिधान केलेल्या कपड्यांवर सूट होतील. या खादी पादत्राणाची किंमत प्रति जोडी 1100 ते 3300 रुपयांपर्यंत आहे.