भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) यांनी सोमवारी चक्रीवादळ अम्फान याच्या कारणास्तव केरळात तुफान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यानंतर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी 14 ते 13 जिल्ह्यांमध्ये यॅलो अलर्ट जाहीर केला आहे. यॅलो अलर्ट म्हणजे लोक आणि अधिकाऱ्यांना सतर्क राहावे लागणार आहे. कारण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी यॅलो अलर्ट प्रदेशाची राजधानी तिरुवनंतपुरम जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे.
तर मंगळवारसाठी 9 जिल्ह्यात यॅलो अलर्ट घोषित करण्यात आला होता. एमआयडीने 24 तासात 64.5 मि. मी. ते 115.5 मि. मी. पाऊस पडण्याची भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. एसडीएमए यांनी भूस्खलन होणारे क्षेत्र आणि नदी किनाऱ्यांसह तट क्षेत्रांना लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.(Cyclone Amphan: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'अम्फान' चक्रीवादळाची स्थिती पाहता उच्चस्तरीय बैठक)
एसडीएमए यांनी विजांच्या कटकटांसह 45 ते 55 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही चेतावणी 22 मे पर्यंत कायम राहणार आहे. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी 4 वाजता अम्फान चक्रीवादळासंदर्भात एक उच्च स्तरीय बैठक पार पडली आहे. त्यामध्ये चक्रीवादळाबाबत तयारी करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.