Pinarayi Vijayan, Nitesh Rane | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केरळ (Kerala News) हे राज्य म्हणजे 'मिनी पाकिस्तान' (Mini Pakistan Remark) आहे. त्यामुळे तेथील वायनाड येथून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या लोकसभेवर निवडून येतात, असे धक्कादायक विधान महाराष्ट्रातील मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले आहे. या वक्व्याचा केंरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी जोरदार निशेष केला आहे. राणे यांचे हे विधान 'अत्यंत द्वेषपूर्ण' आणि 'पूर्णपणे निंदनीय' असल्याचे सांगून विजयन यांनी राणेंवर द्वेषयुक्त प्रचार केल्याचा आरोप केला.

पिनाराई विजयन यांचेकडून निषेध

'एक्स "वर केलेल्या पोस्टमध्ये पिनाराई विजयन म्हणालेः" महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी केरळला' मिनी-पाकिस्तान "असे संबोधून केलेली अपमानास्पद टिप्पणी अत्यंत द्वेषपूर्ण आणि पूर्णपणे निषेधार्ह आहे. अशा वक्तव्यांमधून धर्मनिरपेक्षता आणि जातीय सलोख्याचा बालेकिल्ला असलेल्या केरळच्या विरोधात संघ परिवाराच्या द्वेषयुक्त मोहिमा प्रतिबिंबित होतात. केरळवरील या घृणास्पद हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि संघ परिवाराच्या द्वेषपूर्ण प्रचाराविरूद्ध सर्व लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन करतो. (हेही वचा, Nitesh Rane Mini-Pakistan Remark: 'केरळ मिनी पाकिस्तान, म्हणूनच राहुल-प्रियंका गांधी जिंकले...'; नितीश राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले)

नितेश राणेंची वादग्रस्त विधाने

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचे 42 वर्षीय पुत्र नितेश राणे हे महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर मंत्री आहेत. एका जाहीर सभेत बोलताना राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर केरळच्या वायनाडमधील विजय दहशतवाद्यांच्या पाठिंब्यामुळे झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'केरळ हा छोटा पाकिस्तान' आहे. म्हणूनच राहुल गांधी आणि त्यांची बहीण तेथून निवडून येतात. सर्व दहशतवादी त्यांना मतदान करतात. दहशतवाद्यांना सोबत घेऊन ते खासदार झाले आहेत, असा दावा राणे यांनी केला. (हेही वाचा - Nitesh Rane Provocative Statement: हिंदूंकडे तिरक्या नजरेने पाहणाऱ्याला मारून टाकेल; नितीश राणेंचे प्रक्षोभक वक्तव्य, गुन्हा दाखल)

विरोधकांचा पलटवार

या वक्तव्यांवर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र टीका झाली आहेः

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मंत्री म्हणून राणेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, भारताचे सार्वभौमत्व कायम ठेवण्याची शपथ घेणारा मंत्री एखाद्या राज्याला पाकिस्तान आणि तेथील मतदारांना दहशतवादी कसे म्हणू शकतो? ते त्यांच्या मंत्रीपदावर राहिले पाहिजेत का? हा खरा सवाल आहे. (हेही वाचा -BJP MLA Nitesh Rane यांच्याविरूद्ध प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपाखाली 2 FIRs दाखल

शिवसेना (यूबीटी) नेते आनंद दुबे यांनी भाजपाच्या असुरक्षिततेवर भाष्य केलेः "पंतप्रधान मोदी केवळ एक लाख मतांनी जिंकले आहेत, तर प्रियंका गांधी वाड्रा 4 लाख मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत". त्यामुळे यातून भाजप किती असुरक्षीत झाला आहे हेच या वक्तव्यावरुन दिसते, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Narayan Rane: 'त्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील'; नारायण राणे विधान)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो यांनी राणेंचे वक्तव्य अपमानास्पद असल्याचे म्हटलेः "राणेंच्या वक्तव्याशी सहमत आहोत की नाही हे भाजपने स्पष्ट केले पाहिजे. असे शब्द केरळ आणि भारतातील लोकांचा अपमान करतात. भाजपने त्यावर त्यांची भूमिका व्यक्त केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

संघ परिवाराच्या द्वेशयुक्त प्रचाराविरुद्ध एकत्र येण्याची गरज

आपल्या वक्तव्यावरुन होत असलेल्या चौफेर टीकेनंतर मंत्री नितेश राणे यांनी स्पष्टीकरण जारी केले: "केरळ हा भारताचा भाग आहे. मात्र, हिंदूंची घटती लोकसंख्या ही प्रत्येकाने काळजी करण्याची बाब आहे. हिंदूंचे मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये होणारे धर्मांतर ही तेथे रोजची गोष्ट बनली आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, नितेश राणे यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय तणावाची नवी लाट उसळली असून भाजपकडून भूमिका व्यक्त व्हावी अशी मागणी केली जात आहे. टीकाकारांचा आरोप आहे की, अशा विधानांमुळे भारताची एकता आणि धर्मनिरपेक्षता कमकुवत होते. भाजपने मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.