India's Youngest Female Pilot Ayesha Aziz: आयशा अजीज ठरली भारतातील सर्वात तरुण महिला वैमानिक
Ayesha Aziz (Photo Credits: ANI)

आयशा अजीज ( Ayesha Aziz). वय वर्षे केवळ 25 वर्षे. भारतातील सर्वात तरुण महिला वैमानिक (Youngest Female Pilot in India) . होय, आयशा अजीज या तरुणीने भारतातीस सर्वात तरुण पायलट होण्याच बहुमान मिळवला आहे. या कामगिरीमुळे ही कश्मीरी तरुणी देशातील असंख्य तरुणी आणि महिलांसाठी एक प्रेरणा ठरली आहे. सन 2011 मध्ये आयेशा ही देशातील सर्वात कमी वयाची वैमानिकाचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ठरली होती. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तिने रशियाच्या सोकोल एअरबेसवर MIG-29 jet उड्डाणाचे प्रशिक्षण घेतले.

आयशा अजीज हिच्या शैक्षणिक कारकिर्दीवर बोलायचे तर तिने बॉम्बे फ्लाइंग क्लब-बीएफसी (Bombay Flying Club-BFC) येथून विमानोड्डानाचा व्यावसायिक परवाना घेतला. तिने एएनआयशी बोलताना सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये कश्मीरी तरुणींनी विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. परंतू, वैमानिक म्हणून खूपच कमी कश्मीरी महिला या क्षेत्रात असल्याचे तिने म्हटले आहे. (हेही वाचा, Rafale Squadron's First Woman Pilot: बनारसची कन्या शिवांगी सिंह होणार राफेल विमानाची पहिली महिला पायलट; लहानपणापासूनच पाहिले होते वैमानिक होण्याचे स्वप्न)

पुढे बोलताना ती सांगते की, मला वाटते की, कश्मीरी मिहाल या खूप चांगले काम करत आहे. खास करुन शैक्षणिक क्षेत्रामध्ये. आलिकडे त्या पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊ लागल्या आहेत. घाटीमधील महिलाही चांगली कामगिरी करत आहेत.

तू वैमानिक म्हणून काम करण्याचेच का ठरवले असे विचारल्यावर ती सांगते की, "मी हे क्षेत्र निवडले आहे कारण मला अगदी लहानपणापासूनच प्रवास करणे आवडते. आकाशात उडणाऱ्या विमानांनी लहानपणापसूनच मला खूप आकर्षित केले होते. या क्षेत्रात खूप लोक भेटतात. म्हणूनच मला पायलट व्हायचे होते. हे खूप आव्हानात्मक काम होते. या क्षेत्रात सर्वसामान्य पणे 9 ते 5 अशी कार्यालयीन नोकरी नाही. नकरीची कोणतीही निश्चित पद्धत नाही. आता मला नवीन जागा, विविध प्रकारचे हवामान आणि नवीन लोकांना भेटाण्यासाठी सतत तयार रहावे लागेल, असे ती म्हणाली.

पुढे बोलताना ती म्हणाले, मला माहिती आहे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. माझ्या स्वप्नांना बळ दिल्याबद्दल मी माझ्या आई वडीलांची आभारी आहे. त्यांनी मला माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची मदत केली. मी भाग्यवान आहे कारण माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला इतरांनीही मोठी मदत केली.