उत्तर कर्नाटकातील हुबळी मधील गडंग जिल्ह्यातील लिंगायत मठाने आपल्या परंपरा मोडीत काढत एका मुस्लिम व्यक्तीकडे मुख्य पुजारी पदाचा मान दिला आहे. दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला असं या व्यक्तीचं नाव आहे. दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला (Dewan Sharief Mullah) हे 33 वर्षीय आहेत. 26 फेब्रुवारी दिवशी त्यांचाकडे रितसर विधी केल्यानंतर लिंगायत मठाच्या पुजारी पदाचा मान दिला जाणार आहे. कर्नाटकातील आसुती गावात असलेल्या मुरुगराजेंद्र कोरानेश्वर शांतीधाम मठात शरीफ आता मुख्य पुजारी बनणार आहेत. हा मठ खजुरी गावातील 350 वर्षे पुरातन कोरानेश्वर संस्थान मठाचा (Sri Murugarajendra Koraneswara Swami) आहे. बसवण्णांनी 12 व्या शतकात सामाजिक न्याय आणि बंधुभावाचे स्वप्न पाहिले होते आणि त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करत आम्ही सर्वांसाठी मठाचे दरवाजे उघडले आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान या मठासाठी काही वर्षांपूर्वी शरीफच्या वडिलांनी 2 एकर जमीनदेखील दान केली होती.
'त्यांनी माझ्या गळ्यात पवित्र बंधन बांधत नवी जबाबदारी दिली आहे. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी धर्माच्या रस्त्यावर चालणार आहे. मला प्रेम आणि त्यागाचा संदेश दिला आहे. आता मी देखील तोच पुढे वसाच्या स्वरूपात देईन. त्याचा प्रसार करेन. ' अशी प्रतिक्रिया त्यांनी ANI सोबत बोलताना दिली आहे. शरीफ हे विवाहित असून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
ANI Tweet
Dewan Sharief Mullah: They've put the sacred thread & given me the responsibility. They've given me the 'Ishta-linga' & this honour. I've done the 'Ishta-linga dharan'. I'll walk on the path of dharma. Love & sacrifice is the message given to me, that is what I want to propagate. https://t.co/En3mmHv8k3 pic.twitter.com/moyZHOe5us
— ANI (@ANI) February 20, 2020
आसुती मठ 2-3 वर्षांपासून गावात काम करत आहे. शरीफ हा बसवण्णांकडे आकर्षित झाला असून त्यांच्या वडिलांनी लिंग दीक्षा घेतली आहे. 10 नोव्हेंबर 2019 मध्ये शरीफ यांनी दीक्षा घेतली आहे. लिंगायत धर्म संसाराच्या माध्यमातून मोक्ष प्राप्तीवर विश्वास ठेवतो. त्याची शिकवण समाजामध्ये पसरवतो. मठातील सर्व भक्तांनी शरीफ यांना पुजारी बनवण्यास पाठिंबा दर्शवला आहे.