Karnataka Horror: हुबळीमध्ये प्रेमास नकार दिला म्हणून संतप्त तरुणाने मुलीच्या घरात घुसून केली तिची हत्या; आरोपी फरार, तपास सुरु
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Jilted Lover Kills Woman: कर्नाटकातील हुबळी शहरात एका तरुणीच्या हत्येचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुलीने प्रेमास नकार दिला म्हणून बुधवारी पहाटे संतप्त तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिची हत्या केली. आरोपीने यापूर्वीही तरुणीला धमकावले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 5.30 वाजता आरोपी मुलीच्या घरात घुसला आणि ती झोपेत असताना तिच्यावर हल्ला केला. तिने प्रतिकार करण्याआधीच आरोपीने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. हल्लेखोराला रोखण्यासाठी कुटुंबीयांनी प्रयत्न करूनही त्याने मुलीवर हल्ला करणे सुरूच ठेवले. त्यानंतर तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपी मुलीला घरभर ओढत राहिला, तिला लाथ मारली त्यांनतर तिला किचनमध्ये ढकलले आणि तिच्यावर वार केला. यावेळी पीडितेची आजी आणि दोन बहिणी घरात उपस्थित होत्या.

हुबळी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये नुकतीच नेहा नावाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 'तुझी अवस्थाही तिच्या सारखीच होईल', असा इशारा देत आरोपीने मुलीला यापूर्वी धमकावले होते. बेंडीगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरपुरा ओणी परिसरात ही घटना घडली. अंजली असे मृत मुलीचे नाव आहे, तर मारेकऱ्याचे नाव विश्वा असे आहे. विश्वा सध्या फरार आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीचा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असून तो दुचाकी चोर असल्याचेही समोर आले आहे. अंजलीची आजी गंगाम्मा यांनी यापूर्वी पोलिसांना आरोपीकडून येणाऱ्या धमक्यांची माहिती दिली होती. मात्र, पोलिसांनी तक्रार गांभीर्याने घेतली नाही. (हेही वाचा: UP Shocker: प्रेम करण्याची तरुणाला मिळाली तालिबानी शिक्षा; गावकऱ्यांनी केली मारहाण, चपलांचा हार घालून काढली धिंड, लघवीही प्यायला लावली)

पहा पोस्ट-