'कोट्यवधी हिंदूच्या कोरोना चाचणीचे किट न देउ शकलेले सरकार आता तबलिगी मरकज वर दोष लावतंय'; गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांचे जळजळीत ट्विट
Jignesh Mevani (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभुमीवर देशात लॉक डाउन (Lock Down) जारी होण्याच्या आधी 13 व 15 मार्चच्या दरम्यान दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझ मध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित असणा‍‍‍‍र्‍या आठ हजार जणांपैकी 30 जणांंना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुन या तबलिगी समाजावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.आता या सर्व भांडणात गुजरातचे (Gujrat) आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani)  यांनी तबलिगी समाजाची बाजू घेत एक जळजळीत टीका केंद्र सरकारवर केली आहे. ज्या सरकारला देशातील कोट्यवधी हिंदूंसाठी कोरोनाची चाचणी करणारे किट्स पुरवता आले नाहीत त्यांनी आता स्वतःवरील आरोप तबलिगी मर्झक च्या माथी लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे असे मेवानी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे. तबलीगी मरकज हा तालिबानी गुन्हा... केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी व्यक्त केला तीव्र निषेध

वास्तविक हा धार्मिक कार्यक्रम पार पडला त्या काळात देशात लॉक डाउन नसले तरी लोकांना जमाव बंदीचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे म्हणत अनेकांनी निजामुद्दीन मर्झक मध्ये झालेल्या कार्यक्रमावर टीकेची झोड घेतली होती. केंद्र सरकारने सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी तबलिगी मर्कझ’वरून होत असलेल्या टीकेला ट्विट वरून उत्तर दिले आहे. “गुजरात मॉडेल कामाला लागलं आहे. जे सरकार कोट्यवधी हिंदू देशवासियांना आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभुत सविधा देऊ शकले नाही. ज्यांच्याकडे कोट्यवधी हिंदूची तपासणी करण्यासाठी किट नाही. ते सरकार तबलिगी मर्कझ’वर खापर फोडून संकटाच्या प्रसंगालाही धर्म जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. लाज वाटली पाहिजे,” अशा शब्दात मेवानी यांनी टीका केली आहे.

जिग्नेश मेवानी ट्विट

दरम्यान, तबलिगी जमातीच्या या सामुहिक धार्मिक कार्यक्रमात लोकं एकत्र जमल्याचं समजताच संबंधितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.  तूर्तास केंद्र सरकारकडून याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दुसरीकडे देशात मागील 12 तासात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता देशात 1637 कोरोना रुग्ण आहेत.