झारखंड: सीआरपीएफ जवानांकडून चकमकीदरम्यान तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

झारखंड (Jharkhand) येथील गिरीडीह (Giridih) मध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवादी यांच्यांमध्ये चकमक सुरु होती. याप्रकरणी जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असल्याची माहिती समोर येत आहे. या नक्षलवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्रसाठा जप्त करण्यात आला असून एक जवान शहीद झाला आहे.

बेलाभा घाट परिसरात चकमक सुरु होती. तर गेल्या काही दिवसांपासून जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये सातत्याने चकमकी सुरु आहेत. यापूर्वी भाजप पक्षाच्या रॅलीदरम्यान परत जात असतान नक्षलवाद्यांकडून भूसुरुंग स्फोट घडवून आणला गेला होता. त्यावेळी भाजप पक्षाचे आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला होता.

या जंगल परिसरात जवानांनकडून शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. तसेच नक्षलवाद्यांच्या गोळीबाराल उत्तर देत जवानांनी तिघांचा खात्मा केला असून त्यांच्याकडून एके48, रायफल, 3 मॅगजिन्स आणि चार पाईप बॉम्ब असा शस्रसाठा जप्त केला आहे.