Jhansi Fire (Photo Credit -ANI)

उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात एका शोरूमला लागलेल्या भीषण आगीत एका महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला. सिपरी बाजार परिसरात असलेल्या तीन मजली इलेक्ट्रॉनिक्स शोरूम आणि स्पोर्ट्स स्टोअरला आग लागली आणि लोक आत अडकले. शोरूममध्ये तीन व्यक्ती जिवंत जळाले असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. युनायटेड इन्शुरन्स कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एका महिलेची सुटका करण्यात आली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान भाजल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अग्निशमन दलासह सुमारे 10 तास बचावकार्य केले. झाशीचे जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी आगीचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला असून शोरुम आणि सदर इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत विमा कंपनीतील एका महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला. 18 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने वेढलेल्या पाच जणांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीव वाचवला. कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. शोरूमच्या बाहेर आणि तळघरात पार्क केलेल्या 100 हून अधिक दुचाकीही आगीत जळून खाक झाल्या आहेत. आगीत 35 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.