जेट एअरवेज (Jet Airways) विमानसेवेला लागलेली उतरतीकळा लक्षात आल्यानंतर कंपनीतून अनेकजण बाहेर पडत आहेत. त्यामुळे कंपनीत राजीनामा सत्र सुरु आहे. मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अमित अग्रवाल (Amit Agrawal) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे (Vinay Dube) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. (मुंबई: पगार कमी द्या पण जेट एअरवेज पुन्हा सुरू करा; जेट एअरवेज कर्मचार्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी)
ANI ट्विट:
Jet Airways Chief Executive Officer Vinay Dube has resigned from the services of the Company with immediate effect citing personal reasons pic.twitter.com/akWgWNrLII
— ANI (@ANI) May 14, 2019
जेट एअरवेजमध्ये सुरु असलेल्या राजीनामा सत्रानंतर आता जेट एअवेजच्या डिरेक्टोरीअल टीममध्ये रॉबिन कामारक, अशोक चावला आणि शरद शर्मा हे केवळ तीन डिरेक्टर आहेत. यापूर्वी राजश्री पाथी आणि नसीम जैदी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.