मुंबई: पगार कमी द्या पण जेट एअरवेज पुन्हा सुरू करा; जेट एअरवेज कर्मचार्‍यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
Jet Airways ( Photo Credits: Twitter)

17 एप्रिल दिवशी जेट एअरवेजचं शेवटचं विमान आकाशात झेपावल्यानंतर आता अनिश्चित काळासाठी बंद झालं आहे. पुन्हा जेट एअरवेजची (Jet Airways) विमानसेवा सुरू करण्यासाठी कर्मचारी मुंबईसह अनेक ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आली आहेत. आज जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत. जेट एअरवेज प्रकरणी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

 

जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांनी आज मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत. यावेळेस एकवेळ कमी पगार द्या पण जेट एअरवेज पुन्हा सुरू करा असं म्हटलं आहे. यावेळी 23 मे नंतर राज्य सरकार या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू शकतील असं म्हटलं आहे.

ANI Tweet

यंदा 23 मे दिवशी लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल लागणार आहे. त्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल. मागील काही दिवसांमध्ये जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांनी आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंदोलनं केली होती. जेट एअरवेज कर्मचार्‍यांचा मागील दोन महिन्यांचा पगार झालेला नसल्याने अनेक कर्मचारी चिंतेत आहेत.