शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास बोईसर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या 'तारा नायट्रेट' या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 8 जण ठार आणि अनेक जखमी झाले आहेत. पालघरचे पोलिस अधीक्षक (एसपी) गौरव सिंग दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, तर जखमींना तातडीने पालघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महान फलंदाज सुनील गावस्कर 26 व्या लाल बहादूर शास्त्री स्मारक व्याख्यानमालेदरम्यान म्हणाले, "देश संकटात आहे. आमचे काही तरुण रस्त्यावर आहेत, जेव्हा ते त्यांच्या वर्गात असले पाहिजेत. त्यातील काही जणांना तर रस्त्यावर उतरण्यासाठी रुग्णालयात जावे लागले." तसेच विद्यार्थ्यांना सल्ला देत ते म्हणाले की त्यांना अशा भारतावर विश्वास आहे जिथे संकटाच्या काळावर मात करत लोक पुन्हा नव्याने उभे राहतात.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक 19 फेब्रुवारी रोजी, दिल्ली येथे होणार आहे. यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणे जवळजवळ निश्चित आहे. अशा परिस्थितीत ते पक्षाचे 11 वे अध्यक्ष असल्याचे मानले जाते. सध्या भाजपमध्ये संघटना निवडणुका सुरू आहेत. भाजपच्या राज्यघटनेनुसार 50 टक्क्यांहून अधिक राज्य घटकांच्या निवडणुकांनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाऊ शकतात. 19 फेब्रुवारीपर्यंत भाजपच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त प्रदेशांच्या निवडणुका पूर्ण होतील आणि त्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होईल, असा विश्वास आहे.

दिल्लीत एका कारखान्याला आग लागली आहे. मायापुरी भागातील पादत्राणे बनविण्याच्या फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 23 गाड्या 90 अग्निशमन दलासह घटनास्थळी हजर झाले आहेत आणि आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास दिल्लीच्या मायापुरी फेज 2 परिसरातील पादत्राणे बनविण्याच्या कारखान्यात भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या 23 इंजिन आग विझवित आहेत. आगीत कुणीही अडकले असल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

उस्मानाबाद येथे चालू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यंदाही वादाचे गालबोट लागले. फादर दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राह्मण महासंघाने विरोध केला होता, त्या प्रकरणानंतर आता आज साहित्य संमेलनातील परिसंवाद बंद पाडण्यात आला. 'समाजात बुवाबाजीचं प्रस्थ वाढतंय का?' या विषयावर हा परिसंवाद होता. यावेळी धर्माबद्दल वाद उफाळून आला व हा परिसंवाद मध्येच बंद पाडण्यात आला.  

मुंबई (Mumbai) येथे बीएमसीच्या नायर रुग्णालयात (Nair Hospital) डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रूग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या हल्ल्यानंतर नायर रुग्णालयाचे डॉक्टर संपावर गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हल्ला केला.

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी देश कोणत्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा नाही, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांनी शुक्रवारी जेएनयू मधील हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे, असं वक्तव्य केलं होतं.  

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला पानसरे यांची तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची आज बिनविरोध निवड झाली. 

गुजरात राज्यातील बडोदा येथील ऑक्सिजन प्लान्टमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातल्या सारथी संस्थेतल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ खासदार संभाजीराजे यांनी आज पुण्यात लाक्षणिक उपोषण केलं. दरम्यान, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सारथी संस्थेने केलेल्या विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संभाजीराजे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांना तात्काळ बाजूला करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. (वाचा - पुणे: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीनंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण मागे )
 
 
Load More

उद्यापासून (रविवार) गाई-म्हशीचे दूध 2 रुपयांनी महागणार आहे. राज्यातील दूध कल्याणकारी संघाने याबाबत निर्णय घेतला आहे. नव्या दरांनुसार, गाईचे दूध 48 रुपये तर म्हशीचे दूध 58 रुपये झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचणार आहे. तसेच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. माटुंगा-मुलुंड धीम्या मार्गावर आणि पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचे गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत अप-डाऊन धीमा मार्ग आणि अप-डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. परिणामी, रविवारी लोकलफेऱ्या सुमारे २० मिनिट उशिराने धावणार आहेत.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या 

तसेच दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील कन्नौज (Kannauj) येथे प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात टक्कर होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत.