भारतामध्ये भगवान कृष्ण (Lord Krishna) यांचे जन्मस्थळ मानल्या जाणार्या मथुरेसह (Mathura) देशभर आज जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. यासाठी मथुरानगरीसह जगभरातील कृष्णाची मंदिरं सजली आहेत. या सणाचं औचित्य साधून ट्विटरच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवी उमंग घेऊन येणारा ठरावा अशी प्रार्थना केली आहे. आज देशभरात जन्माष्टमीचा (Janmashtami) सण विविध स्वरूपात साजरा केला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात काल रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर आज (24 ऑगस्ट) दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जाणार आहे. Dahi Handi 2019 Wishes: दहीहंडीच्या मराठी शुभेच्छा, ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करा दहिकाला उत्सव
नरेंद्र मोदी ट्वीट
सभी देशवासियों को श्रीकृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं। जय श्रीकृष्ण!
Janmashtami greetings to everyone! May the blessings of Bhagwan Shri Krishna always bring happiness and good health in our lives. Jai Shri Krishna!
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अबुधाबी मध्ये असून आज त्यांचा मानाच्या पुरस्काराने गौरव होणार आहे. मात्र आज परदेश दौर्यावर असलेल्या मोदींनी भारतीयांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रामनाथ कोविंद ट्वीट
जन्माष्टमी के अवसर पर सभी देशवासियों को बधाई और शुभकामनाएं।
भगवान श्री कृष्ण ने 'निष्काम कर्म' अर्थात् फल की इच्छा किए बिना कर्म करने का संदेश दिया है।
मेरी कामना है कि यह त्योहार सबके जीवन में हर्ष-उल्लास और उमंग लाएं — राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) August 24, 2019
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील आज कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळेस भगवतगीतेतील एक महत्त्वाचा श्लोक शेअर करत त्यांनी जन्माष्टमीचा सण भारतीयांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी कामना व्यक्त केली आहे. Lord Krishna Quotes: भगवतगीता द्वारा श्रीकृष्णाने केलेले हे '5' उपदेश बदलू शकतात तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन
सुरेश प्रभू ट्वीट
May lord Krishna shower all his blessings on you and your family.
Celebrate the birth of the Almighty Lord Krishna. #HappyJanmashtami! pic.twitter.com/uGHDi1y79v
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 24, 2019
देवेंद्र फडणवीस ट्वीट
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला...!
श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !#Janmashtami #JaiShriKrishna pic.twitter.com/nOKL5A60TW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2019
जन्माष्टमी शुभेच्छा
देशभरात सध्या जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्सहात साजरा केला आहे. महाराष्ट्रात जन्माष्टमीच्या दुसर्या दिवशी हंडी फोडण्याच्या साहसी खेळाची मोठी परंपरा आहे. यामध्ये मानवी थर रचून हंडी फोडली जाते. महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून हा खेळ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र यंदा या महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे बेघर झालेल्यांना मदत करण्यासाठी अनेक मोठ्या मंडळांनी हा दहीहंडीचा सण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.