Jammu-Kashmir: सोशल मीडियात देशाच्या विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती जम्मू-कश्मीर पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या अनुसार, आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पत्रकाराने कायदे व्यवस्थेला धक्का पोहचेल आणि जनतेला उकसवण्यासाठी गुन्हाच्या दृष्टीने काही केल्या होत्या. पोलिसांनी असे म्हटले की, प्राथिमिकी संख्या 19/2022 अंतर्गत तपासादरम्यान शाह याला अटक करुन त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
शाह याला पोलिसांनी 1 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत असे म्हटले की, सत्यासाठी उभे राहणे हे राष्ट्राच्या विरोधात मानले जात आहे. फहदचे पत्रकारितेचे कार्य स्वतःच बोलते आणि भारत सरकारला असह्य असलेले ग्राउंड वास्तव प्रतिबिंबित करते. तुम्ही किती फहदला अटक कराल?"(Jammu Kashmir Encounter: श्रीनगरमधील जाकुरा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार)
Tweet:
Standing up for the truth is deemed anti national. Showing the mirror to a deeply intolerant & authoritarian government is also anti national. Fahad’s journalistic work speaks for itself & depicts the ground reality unpalatable to GOI. How many Fahad’s will you arrest? https://t.co/G22lN487zc
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) February 4, 2022
Tweet:
J&K | Accused Fahad Shah has been arrested on the basis of one of the three FIRs lodged against him for glorifying terrorism, spreading fake news, & instigating people, for the past 3-4 years. Court proceedings will be held in the Supreme Court: IGP Kashmir Vijay Kumar pic.twitter.com/0o0F5eq320
— ANI (@ANI) February 5, 2022
डिजिटल मासिक 2011 मध्ये सुरू झाले, जम्मू आणि काश्मीरमधील बातम्या आणि इतर सामाजिक-सांस्कृतिक समस्यांवरील अहवाल देते. गेल्या महिन्यात, कश्मीरवाला येथील प्रशिक्षणार्थी पत्रकार सज्जाद गुल यालाही सरकारच्या विरोधात लोकांना भडकवण्याच्या आणि शत्रुत्व पसरवण्याच्या उद्देशाने ट्वीट पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुल यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.