Jammu Blast:  जम्मू सिटी बसस्टॅन्ड परिसरात ग्रेनेड हल्ला प्रकरणात 'यासिर भट्ट'ला अटक, गुन्ह्याची कबुली दिल्याची जम्मू काश्मिर पोलिसांची माहिती
Jammu Blast (Photo Credits: Twitter)

जम्मू सिटी बस स्टॅन्ड (Jammu City Bus Stand)  परिसरामध्ये ग्रेनेड हल्ला करणार्‍या

यासिर भट्ट (Yasir Bhatt) या  व्यक्तीला पकडण्यात जम्मू काश्मिरच्या पोलिसांना यश आल्याची माहिती देण्यात आली आहे. सीसीटीव्ही फूटेजवरून तरूणाची ओळख पटवण्यात आली. त्यांनंतर चौकशी दरम्यान अधिक माहिती काढून घेताना यासिर याने आपला गुन्हा कबुल केल्याची माहिती मनीष सिंहा ( Manish K Sinha) यांनी दिली आहे.  बॉम्ब स्फोटानंतर पाच तासातच आरोपीला पकडल्याने हे एक मोठे यश समजले जात आहे. गुरूवारी सकाळी जम्मूहून दिल्लीकडे (Jammu - Delhi Bus) जाणार्‍या बसमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याने 30 जण जखमी झाले होते. उपचारादरम्यान एका तरूणाचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर गर्व्हेंमेंट मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटल्समध्ये ( Government Medical College and Hospital) उपचार सुरू आहेत. Jammu Blast: जम्मू सिटी बस स्टॅन्ड परिसरात झालेल्या ग्रेनेड ब्लास्ट मध्ये एकाचा मृत्यू, 28 जखमींवर उपचार सुरू

जम्मू सिटी बस स्टॅन्ड या वर्दळीच्या परिसरामध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. बस स्टॅन्डच्या एक्झिट पॉईंटवरून हा ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली. जखमींपैकी 3-4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये बस ड्रायव्हर, कंडक्टर आणि काही प्रवाशांचा समावेश आहे. ग्रेनेड हा बस खाली ठेवण्यात आला होता अशी माहिती एका स्थानिक पोलिसाने दिली आहे.

बॉम्बस्फोटा नंतर पोलिसांनी या भागामध्ये सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने काश्मिर पोलिस संशियांची कसून चौकशी करत आहेत. पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर हल्ला, भारताकडून पाकव्याप्त काश्मिरमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राईक  यानंतर देशभरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.