Jammu Blast: जम्मू सिटी बस स्टॅन्ड परिसरात झालेल्या ग्रेनेड ब्लास्ट मध्ये एकाचा मृत्यू, 28 जखमींवर उपचार सुरू
Jammu Blast (Photo Credits: Twitter)

गुरूवार 7 मार्च 2019 दिवशी जम्मू सिटी बस स्टॅन्ड (Jammu City Bus Stand) हा भाग बॉम्ब धमाक्याने हादरला. या बॉम्बब्लास्टमध्ये 28 जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हा 17 वर्षीय शरीफ (Shariq) आहे. जम्मूमध्ये आज वर्दळीच्या सिटी बस स्टॅन्डमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला यामध्ये ग्रेनेडचा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. बस स्टॅन्डच्या एक्झिट पॉईंटवरून बसमध्ये स्फोटकं नेली असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. जम्मू बस स्डॅन्डवरून ही बस दिल्लीला रवाना होणार होती. दरम्यान हा स्फोट झाला. जम्मू काश्मिरच्या स्थानिक पोलिसांनी या प्रकरणामध्ये 10 संशयितांना बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जम्मू बस स्टॅन्डजवळील अपघात इतका भीषण होता की परिसरात पार्किंगमधील गाड्यांच्या काचादेखील फूटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी एका न्यूज चॅनलशी बोलताना दिली. सध्या ब्लास्ट झालेल्या परिसरात पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरूवात केली आहे. तर सुरक्षा व्यवस्था अधिक चोख ठेवण्यात आली आहे.

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कॅम्प भारताने उडवल्यानंतर जम्मू काश्मिरमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारतीय सैन्याकडून जम्मू काश्मिर परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू सुरू असते. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएच्या जवानांच्या बसवर हल्ला केल्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारतामध्ये दोन वेळेस पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडण्यास भारतीय हवाई दलाला यश आलं आहे.