Indian Army | Representational Image | (Photo Credit- PTI)

जम्मू-काश्मीर  (Jammu-Kashmir) मधील बारामुला जिल्ह्यातील रामपुर सेक्टर (Rampur sector) मध्ये शुक्रवारी (1 मे) पाकिस्तान (Pakistan) कडून बेशूट गोळीबार करण्यात आला. यात 2 जवान शहीद झाले आहेत. तर 3 सैनिक आणि 4 नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बारामुला जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी त्यांनी रामपुर सेक्टरला आपले लक्ष्य केले. या गोळीबारात जखमी झालेल्या सैनिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी दोघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. शहीद झालेल्या जवानांची नावे हवलदार गोकर्ण सिंह आणि नायक शंकर एस पी अशी आहेत.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चरुंडा, बटग्रान, हथलंगा, मोथल, सहूरा, सिलिकोट, बालाकोट, नाम्बला आणि गरकोट यांसारख्या गावांमध्ये धोका निर्माण झाला. तसंच या गोळीबारात सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ANI Tweet:

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराचा परिणाम उरी शहरापर्यंत झाला. उरी शहरातील एसडीएम रियाज अहमद मलिक यांनी देखील गोळीबारात जखमी झालेल्या जमखींची पृष्टी केली आहे. तसंच सध्या 3 नागरिकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पाकिस्तानकडून सातत्याने सीमाउल्लंघन होत असून नियंत्रण रेषेजवळ गोळीबार केला जात आहे. भारतीय जवानही पाकिस्तानच्या गोळीबाराला सडेतोड उत्तर देत आहेत. तसंच पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय सैनिक सज्ज आहेत.