Borewell | | Photo Credits: Twitter/ANI)

तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या मुलाचा अखेर मृत्यू झाला आहे. हा मुलगा बोअरवेलमध्ये शुक्रवारी (25 ऑक्टोबर 2019) पडला होता. आज सकाळी (मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019) त्याचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बजाव पथक या मुलाला वाचविण्यासाठी 72 तास प्रयत्न करत होते. मात्र, अनेक प्रयत्न करुनही या मुलाला वाचविण्यास अपयश आले. परिवहन विभागाचे प्रमुख सचिव जे. राधाकृष्णन (J. Radhakrishnan) यांनी सांगितले की, 2 वर्षीय मुलाच्या शरीराकडून आता प्रतिसाद येणे बंद झाले आहे. तसेच, त्याच्या शरीरातून आता दुर्गंधीही येऊ लागली आहे. बचाव पथकाने आता खोदकाम थांबवले आसल्याचेही म्हटले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे की, या दोन वर्षीय मुलाचे नाव सुजीत विल्सन ( Sujith Wilson) असे आहे. सुजीतचे मृत शरीर आता शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे. सुजीत विल्सन हा 88 फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये पडला होता. तो बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती कळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी उपस्थिती दर्शवत बचावकार्यास सुरुवात केली होती. मात्र, पाऊस आणि मुरुमयुक्त मातीमुळे बचावकार्यास अडथळा येत होता. (हेही वाचा, धक्कादायक! तामिळनाडूमध्ये शस्त्रक्रिया करून गायीच्या पोटातून काढले 52 किलो प्लास्टिक)

एएनआय ट्विट

प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी (25 ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजणेच्या सुमारास सुजीत विल्सन हा आपल्या घराजवळील बोअरवेलमध्ये पडला. दरम्यान, हा मुलगा शुक्रवारी सायंकाळी बोअरवेलमध्ये पडला होता. मात्र, त्याच्या बचावकार्यार्थ प्रत्यक्ष खोदकाम करण्यास रविवारी सकाळी सुरुवात झाली. या खोदकामासाठी जर्मनीची मशीद वापरण्यात आली होती.