खुशखबर! रेल्वे प्रवासादरम्यान घरात चोरी झाल्यास IRCTC देणार 1 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

महत्वाचे म्हणजे आपल्याला घरातल्या वस्तूंच्या विमासाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागणार नाही. हा विमा पूर्णपणे विनामूल्य असेल.

Close
Search

बातम्या Prashant Joshi|

Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

ट्रेनमधील प्रवासादरम्यान लोकांना आपल्या घरी चोरी होईल या गोष्टीची मोठी चिंता असते. पण आता ही काळजी दूर करण्याची जबाबदारी भारतीय रेल्वे (Indian Railway) घेणार आहे. आपण फक्त आपल्या प्रवासाचा आनंद घ्या, आपल्या घराची चिंता भारतीय रेल्वे करणार आहे. भारतीय रेल्वे एक अनोखा उपक्रम सुरू करीत आहे. या उपक्रमा अंतर्गत तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि तुमच्या घरात चोरी झाल्यास भारतीय रेल्वे तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत विमा देईल. म्हणजेच आयआरसीटीसी (IRCTC) रेल्वे प्रवासादरम्यान घरातील चोरीची नुकसान भरपाई देईल.

महत्वाचे म्हणजे आपल्याला घरातल्या वस्तूंच्या विमासाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागणार नाही. हा विमा पूर्णपणे विनामूल्य असेल. ही सुविधा फक्त आयआरसीटीसी चालविणाऱ्या गाड्यांमध्येच उपलब्ध असेल. सध्या ही सुविधा फक्त तेजस एक्प्रेसमध्ये उपलब्ध आहे. आयआरसीटीसी सध्या तेजस एक्स्प्रेस ट्रेन, नवी दिल्ली-लखनऊ दरम्यान चालवित आहे. नवी दिल्ली-लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खासगी ट्रेन आहे.

महत्वाचे मुद्दे - 

> आयआरसीटीसी ट्रेनमध्ये प्रवास करताना घरी चोरी झाल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा तुम्हाला आयआरसीटीसी देईल.

> ही सुविधा विनामूल्य आहे. या विमा संरक्षणासाठी तुम्हाला आयआरसीटीसीला कोणतेही प्रीमियम देण्याची गरज नाही.

> विम्याची ही सुविधा सध्या फक्त लखनऊ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाश्यांसाठी आहे.

> आयआरसीटीसीने विमासाठी लिबर्टी जनरल विमासह करार केला आहे.

> लवकरच  आयआरसीटीसी आपल्या अन्य खासगी गाड्यांमध्येही अशी सुविधा सुरू करेल.

> जानेवारी 2020 मध्ये आयआरसीटीसी पुढील तेजस एक्स्प्रेस ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालवित आहे. (हेही वाचा: IRCTC ने शेअर केला ऑनलाईन तिकीट बुकिंग करून पैसे वाचवण्याचा फंडा; असा होईल फायदा)

तेजस एक्स्प्रेस प्रवासादरम्यान घरात चोरी झाली असेल तर एफआयआर नोंदवावा लागेल. पोलिसांच्या तपासणीत हे सिद्ध झाले की, आपण ट्रेनमध्ये प्रवास करत होता तेव्हा घरात चोरी झाली होती, तरच आयआरसीटीसी आपल्याला ही विम्याची रक्कम देईल. तेजस एक्स्प्रेसमधील प्रवासादरम्यान, आपल्या सामानासाठी कोणतेही विमा संरक्षण नाही. दिल्ली ते लखनऊ दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेस ट्रेनमध्ये विशेष सुरक्षा पुरवली गेली आहे. त्यामुळे या ट्रेनमध्ये रेल्वे चोरी जवळपास अशक्य असल्याचा दावा आयआरसीटीसीने केला आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change