बऱ्याच वेळा रेल्वे प्रवाशांना आरक्षित तिकिट मिळणे मुश्किल होते. त्यामुळे प्रवाशांना वेटिंग लिस्टचे तिकिट खरेदी करावे. परंतु सकारकडून वेटिंग लिस्ट कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी असे म्हटले आहे की, भारतीय रेल्वे तिकिटांसाठी जाहीर केलेली वेटिंग लिस्ट आता लवकरच कमी होणार आहे. याबाबत पियुष गोयल यांनी ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे.
गोयल यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी अतिरिक्त जागांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना आधीच आरक्षित तिकिट मिळणे सहज शक्य होणार आहे. त्याचसोबत रेल्वेमध्ये नवे डबे सुद्धा जोडण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना वेटिंग लिस्टमध्ये जरी नाव असल्यास कन्फर्म असणारी तिकिट काही दिवसानंतर मिळू शकते. याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याची आशा गोयल यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा फायदा रेल्वे आणि प्रवाशांना सुद्धा होणार आहे. तसेच सध्या रेल्वेचे तिकिटऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकता.(रेल्वे तिकिटाचे टेंन्शन? या सोप्या पद्धतीने करा आरक्षण)
तसेच रेल्वेसाठी प्रायटव्हेटायझेशन करणार का प्रश्नाबाबत गोयल यांनी पूर्णपणे नकार एका पत्रकार परिषदेत दिला. सरकारकडून रेल्वेच्या प्रायव्हेटायझेशनासाठी कोणाता ही प्रयत्न केला जातनाही आहे. परंतु आम्ही रेल्वेत गुंतवणूक करण्याचा अधिक विचार करत आहोत. तसेच रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी जगातिल उत्तम तंत्रज्ञान रेल्वेसाठी वापरण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.