Photo Credit- X

IRCTC Down: भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म(IRCTC) ची वेबसाईट डाऊन झाली. त्यामुळे तात्काळ तिकीट बुकींग पर परिणाम झाला. परिणामी आज कोणताही प्रवासी IRCTC च्या वेबसाईटवरून तात्काळ तिकीट बुक करु शकला नाही. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. संताप व्यक्त करत नागरिकांनी थेट सोशल मिडीयाचा वापर केला आहे. एक्सवर IRCTC ला टॅग करू नागरिकांनी पोस्ट शेअर केल्या आहेत.

वेबसाईट अचानक डाऊन झाल्यामुळे ऑनलाइन बुकिंग, तिकीट रद्द करणे, तात्काळ तिकीट बुकिंग या सर्व सेवा बंद झाल्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नागरिकांनी गावी जाण्यासाठी, पर्यटनासाठी, कामानिमित्त तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. वेबसाईटच काम करत नसल्याने नागरिक हथबल झाले.

वेबसाईट डाऊन होऊन खेप वेळ झाला. मात्र, आतापर्यंत आयआरसीटीसीने या संदर्भात कोणतीही अपडेट शेअर केलेली नाही. देखभालीच्या कामामुळे ई-तिकीटिंग सेवा पुढील 1 तास बंद राहणार असल्याचे मॅसेजमध्ये लिहिले आहे. तिकीट रद्द करण्यासाठी आणि टीडीआर भरण्यासाठी, लोकांना ईमेल किंवा कस्टमर केअर नंबरवर कॉल करण्यास सांगितले जात आहे.

साइट डाऊन झाल्यावर सायबर हल्ला तर नाही ना? असं बोलल जात आहे. एसी तत्काळसाठी तिकीट बुकिंग 10 वाजता होते. तर नॉन-एसी बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते. आयआरसीटीसी सेवा बंद असल्याने दोन्हीही सेवांचे बुकिंग शक्य झाले नाही.