आज 8 मार्च रोजी सर्वत्र जागतिक महिला दिनाचा (International Women's Day) आनंद साजरा केला जात आहे. तसेच प्रत्येक वर्षी महिला दिनानिमित्त एक खास थीम ठेवली जाते. तर यंदाच्या महिला दिनासाठी #BalanceforBetter अशी थीम ठेवण्यात आली आहे. मात्र देशभरात सरकारकडून महिलांना सशक्त बनवण्यासाठी काही पावले उचलली गेली आहेत. त्यामुळे मोदी सरकारकडून महिलांना प्राधान्य देत त्यांच्यासाठी काही योजना सुरु केल्या आहेत. या सुविधांचा महिला घर बसल्याही लाभ घेऊ शकणार आहात.
1. उज्ज्वला योजना-
मोदी सरकारने देशातील सर्व परिवारांना स्वच्छ इंधन उपलब्ध व्हावे यासाठी उज्ज्वला योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील परिवारांना निशुल्क गॅस कनेक्शन देण्यात येते. उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकार तेल कंपनीच्या वतीने 1600 रुपयांची सब्सिडी देते. ही सब्सिडी सिलिंडेरच्या शुल्काबाबत दिली जाते.
2. वन स्टॉप सेंटर-
ही स्किम 1 एप्रिल 2015 रोजी सुरु करण्यात आली आहे. वन स्टॉप सेंटर निर्भया फंडतर्फे लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिलांवर अत्याचार झाले असतात त्यांना या सुविधेचा लाभ घेता येतो. त्याचसोबत पोलीस डेस्क, कायदे आणि मेडिकल सर्विस देण्यात येते. योजनेसाठी 181 टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
3. महिला ई-हाट-
या योजनेअंतर्गत घरी असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सुरु करण्यात आली आहे. ई-हाट योजनेच्या माध्यमातून महिला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करुन स्वत:चा बिझनेस सुरु करु शकतात. याबाबत कोणतेही शुल्क स्विकारले जात नाही.
4. महिला शक्ति केंद्र योजना-
महिला शक्ति केंद्र योजना मध्ये आंगणवाडी केंद्र जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही केंद्र दिसून येतात. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना सरकारने सुरु केलेल्या नव्या योजनांची माहिती दिली जाते. तसेच प्रशिक्षण आणि सामुदायिक भागीदारीच्या माध्यमातून क्षमता विकासाकडे जास्त लक्ष दिले जाते.
5. सुकन्या समृद्धी योजना-
जर तुम्ही तुमच्या मुलीसाच्या भावी आयुष्यासाठी काही गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर सुकन्या समृद्धी योजना हा एक उत्तम पर्याय आहे. बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन 10 वर्षाखालील मुलीचे खाते सुरु करुन या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
त्यामुळे महिलांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आवश्यक लाभ घ्या. कारण महिलांना देशात प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने त्याचा योग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे.