Vartika Singh Letter On Nirbhaya Rape Case (Photo Credits: ANI)

दिल्ली (Delhi) 2012 निर्भया बलात्कार (Nirbhaya Rape Case) प्रकरणातील आरोपींना येत्या 16 डिसेंबरला फाशी दिली जाण्याची शक्यता आहे, याच पार्श्वभूमीवर हे काम करण्याची संधी एका महिलेला देण्यात यावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय शुटर वर्तिका सिंह (Vartika Singh)  हिने केली आहे. याकरिता वार्तिकने गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  यांना रक्ताने पत्र लिहिले असल्याचे समजतेय. "आरोपींचा मृत्यू एका महिलेच्या हातून झाला तर या एकूण प्रकरणाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, तसेच महिला त्यांच्या गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतात याची खात्री पटेल" असे तिने पत्रातून लिहिले आहे. तसेच ही संधी आपल्यलाच देण्यात यावी अशीही इच्छा तिने व्यक्त केली. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी वर्तिकने महिला राजकारणी, अभिनेत्री यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. यातून समाजात बदल व्हावा अशी एकमेव इच्छा असल्याचे वर्तिका सांगते.

प्राप्त माहितीनुसार, निर्भया प्रकरणातील चार आरोपी म्हणजेच पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, मुकेश सिंग आणि विनय शर्मा यांना दिल्लीतील तिहार तुरूंगामध्ये ठेवण्यात आले आहे. अद्याप या चौघांना कोणत्या दिवशी फाशी दिली जाईल याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी माध्यमांच्या रिपोर्टनुसार, यासाठी तयारी सुरु असल्याचे म्हंटले जात आहे.

निर्भया प्रकरण: फाशीच्या शिक्षेमुळे चारही आरोपी डिप्रेशनमध्ये; जेवण झालं कमी!

ANI ट्विट

दरम्यान, हैद्राबाद, उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर देशभरात पुन्हा बलात्कार व बलात्काराच्या आरोपींची शिक्षा या विषयाने पेट घेतला आहे. तसेच, निर्भयाच्या आईने सुद्धा आरोपींना 16 डिसेंबरपूर्वी फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने मात्र 18 डिसेंबर पर्यंत या सुनावणीला स्थगिती दिली असल्याचे समजतेय. तब्बल सात वर्षानंतर या प्रकरणातील प्रक्रियेला आता कुठे वेग आला आहे, मात्र आता नेमकी ही फाशी कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.